माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा सेवासदन प्रशाला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे यांनी केले. स्वागत गीत श्री. विलास कुलकर्णी व सर्व विद्यार्थिनी यांनी सादर केले .प्रमुख अतिथी सौ.अंबालिका वडनाल यांचा परिचय सौ. लक्ष्मी कमळे यांनी करून दिला. दरवर्षीप्रमाणे नेत्रदीपक निकालाची परंपरा सेवासदन प्रशालेने कायम ठेवत 98.89% असा उत्कृष्ट निकाल लागला .
प्रशालेत सेमी माध्यमांमध्ये कु.लावण्या वडनाल हिने 97.60% गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला कु. श्रुती पांढरे 96.40 द्वितीय क्रमांक, कु. वैष्णवी संजय नवले 96% तृतीय क्रमांक ,कुमारी आकांक्षा सुरवसे 95.60% चौथा क्रमांक कु. उन्नती सावळे 94. 7% पाचवा क्रमांक मराठी व संस्कृत विषयात प्रथम क्रमांक, मराठी माध्यमामध्ये कु.मानसी डोके 90. 20 %गुण प्रथम क्रमांक ,साक्षी पिंगळे 89% गुण, द्वितीय क्रमांक नम्रता भोसले 84.80% गुण ,तृतीय क्रमांक कु. समीक्षा गडगडे 84 टक्के गुण चौथा क्रमांक कु.अमृता वाघमोडे 81 टक्के गुण पाचवा क्रमांक या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख अतिथी व पालक सौ. अंबालिका वडनाल यांच्या हस्ते करण्यात आला तसेच मराठी विषयात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी कु. कु.श्रुती घनवट , कु.माधवी कुलकर्णी , श्रावणी मोटे, अक्षदा लाटे, साक्षी कारंडे, प्रणाली मग्गी यांना पारितोषिक प्राप्त झाले.सेवासदन संस्था कार्यकारिणी सदस्य श्री राजेंद्र गांधी यांच्या तर्फे संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर प्राप्त गुण कु.सानिका दसरे ,कु. उन्नती सावळे ,कु.आकांक्षा सुरवसे, कु.लावण्या वडनाल यांना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सौ. बारभाई, सौ. पोतदार, सौ. केळकर, सौ. मोहोळकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. कु. लावण्या वडनाल हिने आपल्या अनुभवातून यश कसे मिळवले हे सांगितले सौ. वडनाल यांनी छान शब्दात अनुभव कथन व शुभेच्छा दिल्या.
सेवासदन संस्था कार्यकारणी सदस्य श्री. राजेंद्र गांधी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शाळा आपल्यावर चांगले संस्कार करते. ज्ञानाची ही शिदोरी घेऊन आज तुम्ही खूप मोठी झेप घेणार आहात व यशाची शिखरे गाठणार आहात. कार्यक्रमातील बक्षीस पात्र विद्यार्थिनींचे गुण वाचन सौ. पेशवे यांनी केले. प्रशालेचे नवनिर्वाचित शिक्षक प्रतिनिधी श्री सतीश घंटेनवरू,Ph.D प्राप्त करून यश संपादन केलेल्या डॉ. अंजली शिरसी, पत्रकारिता विषयात विशेष प्राविण्य प्राप्त श्री. ज्ञानेश्वर काळे आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत विद्यार्थीनींना मार्गदर्शन करणाऱ्या श्री. विलास कुलकर्णीयांचा सत्कार करण्यात आला. शाळेत नवीन आलेल्या शिक्षिका सौ. बोरसे व सौ. बागवडे यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी सेवासदन संस्था अध्यक्ष शीला मिस्त्री, कार्यकारिणी सदस्य श्री .राजेंद्र गांधी , सौ. अंबालिका वडनाल,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका सौ .स्वाती पोतदार,शिक्षक प्रतिनिधी श्री .सतीश घंटेनवरु, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री. अमित देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई यांनी केले.