पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर यांच्यावतीने आयोजित वासंतिक छंदवर्गाचे उद्धाटन समारंभ संपन्न


सेवासदन संस्था शाखा सोलापूर यांच्यावतीने 5 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान विविध छंद वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.या छंद वर्गांचे उद्घाटन सरस्वती पूजन करून सेवासदन संस्थेच्या सचिव सौ. वीणा पतकी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.राजेश्री रणपिसे यांनी प्रास्ताविक सादर केले त्यांनीं सांगितले की विविध नृत्य, बासरी, सूत्रसंचलन व्हिडिओ मिक्सिंग, नाट्यकला, पार्लर, मराठी हस्ताक्षर, संस्कार वर्ग, चित्रकला यांचे सकाळी 9 ते 10 या वेळेत तर ढोल ताशा, जुदो कराटे, कथ्थक नृत्य, बेसिक कोडींग, पाचबोटी रांगोळी, मेहंदी, इंग्रजी संभाषण, तबला, साडीला गोंडे लावणे यांचे वर्ग सकाळी 10 ते 11 या वेळेत घेण्यात येतील . तसेच वयोगट 5 ते 7 वर्ष साठी बाल आनंद मेळावा सकाळीं 9 ते 11 या वेळेत घेण्यात येइल प्रत्येक छंद वर्गाची फी 150रूपये आहे. फक्त विद्यार्थीनी व महिला यांना छंद वर्गमध्ये प्रवेश देण्यात येईल.


वरील छंदवर्गांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सेवासदन संस्था सचिव सौ. वीणा पतकी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी संस्थासचिव सौ. वीणा पतकी, सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार तसेच छंद वर्ग प्रशिक्षक आर .जे .अमृत, सौ. भारती देशक, श्री. आयाचीत, श्री. उमेश मोहोळकर, श्री. रेवणसिध्द कट्टे, सौ. शोभा पाटकुलकर, सौ. श्रुती मोहोळकर, कु. प्रेरणा पवार, श्रीमती सपना मगेरी, सौ. रुपाली दांडगे, कु. ममता अवस्थी, श्रीमती सुलभा पवार, श्री. विलास कुलकर्णी, श्रीमती अंजली शिरसी, श्री. किरण जोशी, कु. ऐश्वर्या ठाकूर, जान्हवी गांधी उपस्थित होते.