१ ली आणि २ री च्या मुलींसाठी एकदिवशीय शिबिर


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे इयत्ता १ली आणि २री च्या मुलींसाठी आज शनिवार, दिनांक २४/०२/२०२४ रोजी एकदिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराची सुरुवात बाहुला बाहुलीचे लग्न लावून, वरातीतून पर्यावरण रक्षणाचे, आवाजाचे प्रदूषण, सायकल वापर फायदे, झाडे लावा असे संदेश देऊन करण्यात आले. लग्नाची वरात सायकलवर काढण्यात आली. विद्यार्थिनींनी गाण्याच्या तालावर सुंदर सुंदर नृत्य सादर केले. यानंतर मुलींनी लग्नाच्या जेवणाचा आस्वाद घेतला.
विद्यार्थीनींनी भातुकलीचे खेळ खेळले. शाळेत खेळण्यासाठी ‘Trampoline, Jumping and Sliding Bouncy Game, Merry go round car’ आणण्यात आले होते, जे खेळण्यात सर्व मुली दंग झाल्या होत्या. अशा आनंददायी वातावरणात मुलींचे आज शाळेमध्ये शिबिर पार पडले.