घरातील स्त्री उच्चशिक्षित झाली तरी मुलांच्या संगोपनाच्या कारणामुळे ती मोकळेपणाने आपले कार्यक्षेत्र सांभाळू शकत नाही. स्त्रियांची ही समस्या ओळखून अशा नोकरी व्यवसाय करणाऱ्या आईसाठी गोकुळ पाळणाघरची सुविधा सेवासदनाने गेल्या तीस वर्षांपासून अविरतपणे चालवलेली आहे. सेवासदनच्या गोकुळामध्ये हे छोटे बालगोपाळ आनंदाने रमतात आणि त्यांच्या माता त्यांना इथे सोपवून आपले कार्य चोख बजावतात. इथे मुलांना सांभाळण्यासाठी दोन मावश्या आहेत. याशिवाय अनेक प्रकारची खेळणी, मोठे पटांगण आणि लक्ष ठेवण्यासाठी आजूबाजूला खूप लोक असल्याने मुले सुरक्षित राहतात.
कर्मचारी
कर्मचारी