देणगी आवाहन
स्त्री हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांना समाजामध्ये असणारे दुय्यम स्थान लक्षात घेऊन स्त्री-सशक्तीकरणासाठी रमाबाई रानडे यांनी पुढाकार घेत १९०९ साली पुणे येथे सेवासदन संस्थेची स्थापना केली. या संस्थेची एक शाखा १९२३ साली सोलापूर येथे स्थापन झाली.
सन २०२३ हे संस्थेचे शताब्दीपूर्तीचे वर्ष. या शंभर वर्षांमध्ये संस्थेने स्त्रिया व मुलींच्या विकासासाठी अनेक उत्तमोत्तम कार्य केलेले आहे. रमाबाईंचा स्त्री-सशक्तीकरणाचा हा वारसा पुढे नेण्यात संस्थेला अत्यंत आनंद होत आहे. हे कार्य अनेक शतके असेच चालू ठेवण्यासाठी, स्त्रियांना, मुलींना योग्य प्रकारे विकसित करण्यासाठी, त्यांना सर्व दृष्टीने सबल बनवण्यासाठी आम्हाला कालानुरूप संस्थेचाही विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला आपल्याकडून आर्थिक सहकार्याची अपेक्षा आहे.
स्त्री-सशक्तिकरणाच्या संस्थेच्या या अमूल्य कार्यात आपण रोख देणगी किंवा वस्तूस्वरूपात देणगी देऊन आपला मोलाचा वाटा उचलू शकता. तुम्ही दिलेल्या रोख स्वरुपातील देणगीचा फायदा तुम्हाला section 80G च्या अंतर्गत तुमचे आयकर रिटर्न भरताना नक्कीच होणार आहे.तेव्हा आजच आपल्या इच्छेने संस्थेला देणगी स्वरूपात मदत करून संस्थेला सहकार्य करावे असे आम्ही आपणा सर्वांना आवाहन करत आहोत.
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपण आपली देणगी संस्थेला जमा करू शकता.
देणगीसाठी तुम्ही खाली दिलेल्या बँक डिटेल्स वर Gpay/Phonepay/ Bank transfer करु शकता.
Bank Details
Account Name – Pune Sevasadan Society
Bank Name – Canara Bank
Branch- Saraswati chowk, Solapur
Account No- 0276101009724
IFSC code – CNRB0000276
धन्यवाद.