सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन


“हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे देशभक्तीपर मूल्य रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींसाठी देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा राखी बनवणे व कागदकामातून तिरंगा कलाकृती निर्मिती व तिरंगा बॅच निर्मिती पण घेण्यात आली ज्यातून त्यांची सृजनशीलता आणि देशप्रेम व्यक्त झाले. देशभक्तीपर गीतांच्या गायनातून उत्साहवर्धक व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
तिरंगा रॅलीद्वारे राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला तर मतदान जागृती रॅलीतून लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले.
‘एक पत्र सैनिकांसाठी’ हा उपक्रम देखील घेण्यात आला.
तसेच विद्यार्थिनींना भारतीय सैनिकांवरील प्रेरणादायी व्हिडिओ व शिस्तबद्ध संचलन दाखवण्यात आले. यातून विद्यार्थिनींना सैनिकांचे शौर्य, त्याग, देशप्रेम आणि शिस्त यांची प्रेरणा मिळाली.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये देशप्रेम, सामाजिक जबाबदारी, एकता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव दृढ झाली.
याच बरोबर सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष असल्याने दिनांक १४/०८/२०२५ रोजी विद्यार्थिनी ने पसायदान म्हणले ज्यातून भक्तीभाव, सद्विचार आणि समाजकल्याणाची भावना विकसित होण्यास मदत होईल.