सु. रा. मुलींचा प्रशाला सेवासदन येथे भारतीय लोकशाही पद्धती, मतदानाचा हक्क, आचार संहिता यांची माहिती विद्यार्थिनींना होण्यासाठी इतिहास विभागातर्फे स्वराज्य सभा निवडणूक घेण्यात आली. इयत्ता ८वी, ९वी व १०वीतील विद्यार्थिनी व स्वराज्य सभा प्रतिनिधी यांनी पंतप्रधान, उपपंतप्रधान, सभापती, उपसभापती या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन गुप्त मतदान केले. विद्यार्थिनींनी अतिशय व्यवस्थित व शांततेत मतदान केले. संगणकावर विद्यार्थीनी मतदारांनी मतदानाचा अनुभव घेतला. या उमेदवारांमधून पंतप्रधान पदी कु. तनया संजय देशपांडे, उपपंतप्रधान पदी कु. श्रेया सिध्देश्वर वराडे, सभापती पदी कु. जान्हवी प्रशांत गायकवाड उपसभापती पदी कु. स्वरांजली हरिश्चंद्र चव्हाण यांनी मताधिक्याने विजय प्राप्त केला.
निवडून आलेल्या विद्यार्थिनींचा इतिहास प्रमुख सौ. मीनल उदनूर यांनी सांगितल्याप्रमाणे शपथविधी समारंभ घेण्यात आला. यात शालेय शिस्त, शाळेची प्रगती, शाळेचा सन्मान यासाठी सदैव जागृत राहून कार्य करण्याची शपथ घेण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे यांनी विद्यार्थिनींना शालेय शिस्तीचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने जबाबदारीने शांततेने वागावे असा संदेश दिला. स्वराज्य सभा निवडणुकीसाठी तंत्रस्नेही शिक्षक श्री. रेवणसिद्ध कट्टे, श्री. अमित देशपांडे, सौ. स्मिता कोर्टीकर, सौ. रुपाली पवार, सौ. रत्नप्रभा हजारे, सौ. स्नेहल बागवडे यांनी परिश्रम घेतले. इतिहास विभाग प्रमुख सौ. मीनल उदनूर, श्री.सतीश घंटेनवरू, श्री. जयवंत दुरुगकर, सौ. वंदना लामतुरे, श्रीमती मीरा जमादार, सौ. मीरा राक, सौ. प्रीती मेकाले, सौ. रोहिणी निराळे, सौ. लक्ष्मी कमळे, सौ. देव यांनी मंत्रीमंडळ निवडणुकीत मोलाचे सहकार्य केले.
शपथविधी व मंत्रीमंडळ सत्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मीरा जमादार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचलन श्री.सतीश घंटेनवरू यांनी केले.










