गुरुवार, दि. १०/७/२०२५ शाळेच्या प्रांगणामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला बुर्हानपुरे मॅडम उपस्थित होते. माननीय चिटणीस वीणा पतकी, शालेय समिती अध्यक्ष ॲड. अर्चना जोशी , मार्गदर्शक शिक्षिका मंजुषा राठी मॅडम, माननीय मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांचीही उपस्थिती होती. महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.दीप प्रज्वलन झाले. माननीय मुख्याध्यापिका यांनी बुरानपुरे मॅडम यांचा सत्कार केला. बुरानपुरे मॅडम यांनी आपल्या लाडक्या बाल चिमुकल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आपल्या बाल चिमुकल्यांनी खूप छान प्रकारे गुरुंबद्दल भाषण केले. आपल्या शाळेतील सहशिक्षिका मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.



