सु. रा. मुलींची प्रशाला सेवासदन येथे इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी संस्कार शिबीर संपन्न


सेवासदन प्रशालेमध्ये इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले . व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार व स्वागत इयत्ता ५ वी च्या केअरटेकर सौ .स्मिता कोर्टीकर यांच्या हस्ते करण्यात आले . मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे यांनी विद्यार्थिनींना शालेय शिस्त , गणवेष याविषयी मार्गदर्शन केले उपमुख्याध्यापिका सौ . नंदिनी बारभाई यांनी विद्यार्थी दशेतच योग्य संस्कारांची पेरणी होते ,त्यातूनच भावी पिढी संस्कारक्षम घडते .हे चांगलेसंस्कार विद्यार्थिनींच्या मनावर कोरून सेवासदन प्रशाला आदर्श विद्यार्थिनी घडवण्याचे कार्य अखंड पणे करीत आहे असे सांगितले .

पर्यवेक्षिका सौ स्वाती पोतदार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत आपल्या पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखा स्थापना १९२३ मध्ये झाली असून विद्यार्थिनींना सुसंस्कारित करून मोठ्या पदावर नेण्याचे कार्य आपली संस्था करत आहे असे प्रतिपादन केले . विद्यार्थिनींकडून ओमकार घेण्यात आले . ‘मना घडवी संस्कार । मना फुलवी संस्कार । ‘ नुसार संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विद्यार्थिनींच्या संस्कारक्षम वयात प्रार्थना, बोधकथा, कृतीयुक्त गाणी अतिशय सुश्राव्य आवाजात प्रशालेतील शिक्षिका सौ. स्मिता कोर्टीकर यांनी घेतली . देवा तुझे किती सुंदर आकाश , हमको मन की शक्ती देना । , हीच आमची प्रार्थना , मारुती स्तोत्र , श्लोक सौ. कोर्टीकर यांनी घेतले . राष्ट्रगीत म्हणत असताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी राष्ट्रगीत योग्य कसे म्हणावे याचे प्रात्यक्षिक सौ. प्राजक्ता टिळेकर यांनी दाखवले.

८ वी तील विद्यार्थिनी कु . प्रांजली पोतदार हिने पेटीवर साथ दिली . स्वच्छतेचे महत्त्व व शालेय शिस्तीचे नियम यांविषयी ७ वी मधील कु. सृष्टी कोळेकर , आरुषी शिंदे कु. गौरी सुरवसे , कु. सुदिक्षा उडाणशिव , दिप्ती शिंदे , कु.आर्या जरग , कु .अथर्वा पुजारी , कु.अंकिता पाटील यांनी नाटक सादर केले . त्यानंतर सहशिक्षिका सौ. वर्धा माळगे यांनी गोटीव कागदापासून सुंदर फुले कशी तयार करायची हे शिकवले .विद्यार्थिनींनी उत्साहाने फुले तयार केली . विद्यार्थिनींच्या कला गुणांचे सादरीकरण व्यासपीठावर झाले . विद्यार्थिनींना प्रशालेतर्फे बिस्कीटपुडे खाऊ देण्यात आला . त्यानंतर शालेय परिसरातील ग्रंथालय , प्रयोगशाळा ,चित्रकला हॉल , बाग , Smart TV यांची माहिती करून देण्यात आली . त्यानंतर कवायत प्रकार मैदानावर घेण्यात आले विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले .

शिबीरासाठी ५ वीच्या वर्गशिक्षिका सौ. अर्चना नाईक , सौ. प्राजक्ता टिळेकर , सौ.स्नेहल बागवडे , सौ. सुविधा कदम ,सौ. जयश्री पवार व केअरटेकर सौ .स्मिता कोर्टीकर यांनी परिश्रम घेतले . अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संस्कार शिबीर संपन्न झाले .

सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन सौ. अर्चना नाईक यांनी केले.