आषाढी एकादशी निमित्त सेवासदन प्राथमिक शाळेत दिंडी व रिंगण नृत्य


आज शनिवार, दिनांक ०५/०७/२०२५ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आषाढी एकादशी निमित्त एक आगळीवेगळी भक्तिमय वातावरण सजावट अनुभवायला मिळाली. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून “दिंडी, रिंगण, नृत्य” सादर केले.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत नामदेव, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, संत सकूबाई यांच्यासह वारकरी संप्रदायाचे मूर्तिमंत दर्शन या सादरीकरणातून घडले.
काही विद्यार्थिनींनी विठ्ठलाच्या जीवनावर आधारित नृत्य सादर करत प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले.

भावस्पर्शी गीतं, टाळ-मृदुंगाचा नाद आणि “विठू माऊली”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसला.

“ज्ञान, भक्ती आणि संस्कृतीची जोपासना” हेच आमचे ध्येय!