शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता 10 वीची पालकसभा २४ जून २०२५ मंगळवार रोजी सेवासदन प्रशाला सोलापूर येथे संपन्न झाली .पालक सभेचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा . राजेश्री रणपिसे यांनी केले.दहावी बोर्ड संबंधीचे सर्व नियम तसेच सर्व विषयांच्या गुणदानाविषयी माहिती दिली तसेच दहावीचा अभ्यास विद्यार्थिनींनी कसा करावा व पालकांनी त्याकडे कसे लक्ष द्यावे यासंबंधी मार्गदर्शन प्रशालेच्या सहशिक्षिका सौ .संध्या सुतार यांनी केले . प्रशालेची शालेय शिस्त व खेळाविषयी चे नियम आणि ग्रेड परीक्षा विषयी माहिती , खेळ कला या विषयांचे मिळणारे अतिरिक्त मार्क याविषयी माहिती प्रशालेतील क्रीडाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितली.गणित विषयासाठी पालकांचे उद्बोधन प्रशालेतील गणित शिक्षक श्री . सुधीर देशमुख यांनी केले .
मुख्याध्यापिकांच्या परवानगीने प्रत्येक दहावीच्या वर्गातून पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पालकांच्या शंकांचे निरसन मुख्याध्यापक व दहावीच्या शिक्षकांनी केले .पालक सभा संपन्न होत असताना प्रशालेत राबवण्यात येणारे विविध उपक्रम याचा अहवाल पीपीटी द्वारे पालकांना दाखवण्यात आला . त्यासाठी प्रशालेतील शिक्षक श्री . रेवणसिद्ध कट्टे यांनी सहाय्य केले .
पालक सभेस प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा . राजेश्री रणपिसे ,पर्यवेक्षिका सौ .स्वाती पोतदार ,इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व विषयशिक्षक उपस्थित होते .
पालक सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेतील सहशिक्षिका सौ . मीनल उदनूर यांनी केले .
पालक सभा पार पडण्यासाठी इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .



