कै. सौ. तगारे बालक मंदीर सेवासदन, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थिनींचे स्वागत


कै. सौ. आनंदीबाई द.तगारे बालक मंदीर सेवासदन सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. फुलांच्या पायघड्या घालण्यात आले तसेच मुलींचे आवडते भीम, चुटकी, फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले. विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या सचिवा मा सौ. वीणा पतकी, ॲड. अर्चना जोशी मार्गदर्शक शिक्षिका मनीषा राठी, मा मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा, यांच्या उपस्थितीत रोडगे व स्वामी या पालकांच्या यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मुलींना खाऊ वाटप करण्यात आले. माननीय मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले. शाळेच्या सर्व शिक्षिका, सेवक वर्ग, पालक, पत्रकार हे उपस्थित होते.