सेवासदन प्रशालेत नवीन प्रवेशित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . पालखी मध्ये ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, महाभारत या ग्रंथांचे संस्थेच्या अध्यक्षा मा .शीला मिस्री , संस्थेच्या सचिवा सौ . मा .वीणा पतकी ,माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्षा मा .विद्या लिमये , कार्यकारिणी सदस्य मा.डॉ .श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व ग्रंथ दिंडी काढण्यात आली .
गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले . इ ९वी तील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक मध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे यांनी सर्व विद्यार्थिनींचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करून नवीन क्षितीजे गाठण्यासाठी अभ्यास करा नवीन कौशल्ये आत्मसात करा असे आवाहन केले संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात आली . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ . स्मिता कोर्टीकर,सौ. सुविधाकदम, सौ. रोहिणी निराळे ,सौ. स्नेहल बागवडे, सौ. अर्चना नाईक, सौ .टिळेकर, सौ. जयश्री पवार यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमप्रसंगी पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर च्या अध्यक्षा मा.शीला मिस्त्री, संस्थेच्या सचिवा सौ. वीणा पतकी, माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष मा. विद्या लिमये, कार्यकारिणी सदस्य डॉ.श्री . श्रीकांत येळेगावकर ,सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे , उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई ,पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार , शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मीरा जमादार उपस्थित होते . प्रशालेतील सर्व शिक्षक ,बंधू भगिनी ,शिक्षेकतरकर्मचारी ,पालक ,पत्रकार उपस्थित होते .
सूत्रसंचलन सौ. रूपाली पवार यांनी केले .















