सौ. महादेवी कोळी यांना शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सौ. महादेवी कोळी यांना शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

पुणे येथील शिवसमर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर येथील सु .रा .मुलींची प्रशाला सेवासदन मधील सौ. महादेवी कोळी यांना जाहीर झाला आहे. शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या कमिटीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.


शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील शाळा, संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचा शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो तसेच प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक उन्नतीसाठी देणगीदारांच्या मदतीने गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. सेवासदन प्रशालेच्या मुख्य लिपीक सौ. महादेवी कोळी यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


सदर शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. ०१ जून २०२५ रोजी निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, सिंहगड रोड, पुणे येथे जेष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनिस यांचे अध्यक्षतेखाली व प्राचार्य गुलाबसिंह कदम, माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर च्या अध्यक्षा मा. श्रीमती शीला मिस्त्री, उपाध्यक्ष मा . डॉ .राजीव प्रधान संस्थेच्या सचिवा मा . वीणा पतकी ,शालेय समिती अध्यक्ष मा.श्रीमती विद्या लिमये, कार्यकारिणी समिती सदस्य मा.श्री. पद्माकर कुलकर्णी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मीरा जमादार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .