तगारे बालक मंदिर येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालिकांसाठी ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा


पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर संचलित. कै. सौ आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालिकांसाठी ठिपक्यांची रांगोळी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत मोठ्या संख्येने पालिकांनी भाग घेतला. स्पर्धेतील रांगोळीचे परीक्षण श्रीमती ममता अवस्थेत यांनी केले. प्रथम क्रमांक सौ कांचन गंगाधर लुगडे, द्वितीय क्रमांक सौ श्रद्धा स्वप्निल पोद्दार, तृतीय क्रमांक सौ सुजाता राजकुमार नीळ. उत्तेजनार्थ सौ पूजा अमर जाधव व सौ संगीता यशवंत बुर्हाडे. या स्पर्धकांना बक्षीस संस्थेच्या सचिवा श्रीमती विना पत्की व शालेय समिती अध्यक्ष ॲड. अर्चना जोशी मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले. श्रीमती संगीता आपटे मुख्याध्यापिका यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेतील सर्व सहशिक्षिका उपस्थित होत्या.