सेवासदन प्रशाला सोलापूर च्या केतकी चौगुले हिची सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राज्यस्तरीय निवड


सेवासदन प्रशालेने शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे सॉफ्ट टेनिस स्पर्धेत केतकी चौगुले ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली . डॉजबॉल स्पर्धेत देवयानी यादव , गिरीजा भोसले , प्रतिभा गुंड , सिध्दी गायकवाड , राजकन्या चव्हाण यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे . कराटे असो. पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काव्या जगताप हिला ब्राँझपदक प्राप्त झाले . वैदेही नवले हिला फाईट प्रकारात गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे . पंढरपूर येथे गतका खेळाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते .त्यात नेहा जगताप श्रावणी मोरे गिरीजा भोसले श्रेया पाटील , अक्षरा जाधव , ज्ञानेश्वरी मोरे , किर्ती शिंदे , प्रिया काशीद यांची निवड झाली आहे . किकबॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी मोटे हिची विभागीय स्पर्धेत निवड झाली .
याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री ,सचिवा वीणा पतकी , शालेय समिती अध्यक्ष उमेश मराठे ,संचालक डॉ . राजीव प्रधान प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे , उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई ,पर्यवेक्षक सौ. स्वाती पोतदार ,शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटेनवरू सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले .
वरील सर्व खेळाडूंना क्रीडाप्रमुख ज्ञानेश्वर काळे यांचे मार्गदर्शन लाभले .

डावीकडून बसलेले सतीश घंटेनवरू ( शिप्र ),पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, संचालक डॉक्टर राजीव प्रधान ,संस्थेच्या सचिवा विणा पतकी, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई ,क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे