योग साधना मंडळ सोलापूर व सेवासदन संस्था पुणे शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मोफत योग शिबिर सेवासदन संस्था सोलापूर येथे परमपूज्य कै,नानासाहेब पाठक सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते,या शिबिरात योगगुरू आदरणीय रोहिनिताई उपळाईकर यांचे मार्गदर्शन लाभले ,या शिबिराचे उद्धाटन प्रशालेच्या पर्यवेक्षक सौ स्वाती पोतदार व मुख्याध्यापिका सौ राजश्री रणपिसे यांच्या शुभहस्ते झाले योग साधना मंडळाचे सर्व संचालक, पदाधिकारी व सदस्य तसेच विविध शिबिरार्थी यावेळी उपस्थित होते या शिबिरामध्ये विविध योगासने ,प्राणायाम, ध्यान व आरोग्य विषयक विविध विषयांवर माहिती देण्यात आली,या शिबिरात डेमो देणारे श्री. संतोष खराडे, सौ जयश्री उंबरजीकर,तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. नागनाथ पाटील श्री. सोनी श्री. गिरीश देशपांडे. (व्यासपीठावर) श्री. योगीराज कलुबर्मे ,वंदना तिनईकर सौ. मानसी मोकाशी. यांनी परिश्रम घेतले ,सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ,आभार जयश्री ताई यांनी मानले व योग साधना मंडळाचे सदस्य होण्यासाठी आवाहन करण्यात आले.