सेवासदन मुलींच्या प्रशालेमधे पक्षी सप्ताह साजरा


पक्षी झाडावरच नाही तर जमीनीवर आणि जमीनीत बीळ करूनही घरटी बनवतात

मुलींनी जाणून घेतलं पक्षी जगतातील गमती जमती . सेवासदन मुलींच्या प्रशालेमधे पक्षी सप्ताह साजरा करून केला आनंदी शनिवार
सोलापूर दिनांक 16, सेवासदन मुलींची प्रशाला, सोलापूर आणि जी आय बी फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पक्षी सप्ताहा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. परंतू दिवाळीच्या सुट्यांमुळे शाळेत उपक्रम राबवता आले नाहीत. पण मुलींना पक्षाची ओळख करून देणे आणि पर्यावरण संवर्धनाचे संविधानीक मुलभूत कर्तव्य रुजवण्याची या उदात्त हेतुने आजचा कार्यक्रम शाळेतर्फे आयोजित केला गेला. या कार्यक्रमात मुलींना छायाचित्रे व पोस्टर्स च्या माध्यमातून सोलापूरच्या जैवविविधतेची ओळख करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाच्या अनोख्या दुनीयेतील गमती जमती रंजक पद्धतीने सांगत माहिती देण्यात आली.

आधुनिक मानवी जीवनशैलीमुळे पक्षांच्या नैसर्गिक आधीवासात घट होत आहे. पारंपारीक शेती पासून दूर जात आपण निसर्गापासून ही दूर जात आहोत. अवैध शिकार, तस्करी, नैसर्गिक अधिवासाचा र्हास यामुळे पक्षांच्या अनेक प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आपण वेळीच कृती करुन या निसर्गाच्या अमुल्य ठेविचे जतन केले पाहिजे असे जी आय बी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर यांनी मुलांना सांगितले.

निसर्ग पाहण्यासाठी निसर्गाची दृष्टी स्वीकारुन आपण पक्षी निरीक्षण केले पाहीजे. पक्षी निरीक्षण करण्यासाठी निसर्गाशी मिळते जुळते कपडे घातले पाहीजेत.नोंदवही,पेन/पेन्सिल,दुर्बीण ,आणि पक्षांच्या माहितीचे पुस्तक(फील्ड गाईड) बरोबर ठेउन शांततेने पक्षी निरीक्षण केले पाहिजे असे वनकर्मचारी श्री संजय भोईटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

श्री राजकुमार कोळी यांनी पक्षांच्या छायाचित्रे व पोस्टर्स ची मांडणी करून मुलांना निसर्गाची सफर घडवली.

शाळेच्या साहित्य संग्रहात वाढ व्हावी आणि त्या द्वारे मुलांमधे नविन ज्ञानाची वाढ व्हावी यासाठी जीआयबी फाउंडेशन तर्फे शाळेच्या ग्रंथालयास ‘माळढोक पक्षी अभयारण्य’ हे सचीत्र कॉफी टेबल बुक आणि माळढोक पक्षी अभयारण्य व परीसरातील वन्यजीव हे दोन ज्ञानकोष भेट देण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ स्वाती पोतदार,शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटेनवरु उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार सौ अश्विनी वाघमोडे यांनी मानले.