पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर तर्फे शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळे चे उद्घाटन सेवासदन संस्था सचिव सौ . वीणा पतकी , कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव प्रधान श्री. पद्माकार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले . सरस्वती मूर्तीचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी सेवासदन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. श्री . राजीव प्रधान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षकांनी तंत्रस्नेही होऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे . आज शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करून शिक्षण देणे गरजेचे आहे . सेवासदन संस्थेच्या सचिवा सौ . वीणा पतकी अध्यक्ष स्थानी होत्या .
सर्व शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .
कार्यक्रम प्रसंगी सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे , उपमुख्याध्यापिका सौ . नंदिनी बारभाई ,पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार ,शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटेनवरू , शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.