संस्कृत दिनानिमित्त सेवासदन प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवर सेवासदन संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री, प्रमुख पाहुणे मा.श्री गोविंद दाते यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. स्वागत गीत संगीत शिक्षक श्री. विलास कुलकर्णी व विद्यार्थिनींनी सादर केले. संस्कृत भाषेची थोरवी या गाण्यातून सादर केली. प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ .स्वाती पोतदार यांनी केले. बाणभट्ट ,कालिदास यांचे संस्कृत भाषेसाठी साहित्य प्रसिद्ध आहे संस्कृत ही देववाणी आहे.असे त्यांनीं सांगितले प्रमुख पाहुणे श्री गोविंद दाते यांचा परिचय सौ श्रृती कोठाडिया यांनी करुन दिला. त्यांचा सत्कार सेवासदन संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी केला. कु. तन्वी अरळी ९वी अ, कु. प्रियदर्शनी गुंड ९ वी अ या विद्यार्थिनींनी संस्कृतमधून कथा सादर केल्या. संस्कृत सुभाषितांच्या भेंड्या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला प्रमुख पाहुणे श्री गोविंद दाते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संस्कृत भाषा ही संस्कारित भाषा आहे स्तोत्रांमुळे भाषा शुद्ध होते. संस्कृत जीवंत ठेवण्यासाठी सुभाषिते शिकली पाहिजे. सुभाषित रत्नसागर मध्ये १००० च्या वर सुभाषिते आहेत. संस्कृत भाषेतील वाचन साहित्यासाठी शारदा मासिक, अमरकोष, चांदोबा गोष्टीचे पुस्तक ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याचा वापर करावा .
सेवासदन संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री, प्रमुख पाहुणे श्री गोविंद दाते, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षिका स्वप्ना केळकर, सौ.श्रुती कोठाडीया, श्री. अमित देशपांडे, सौ.स्मिता कोर्टीकर उपस्थित होते.