क्रांतीदिन निमित्त सेवासदन प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायन शिक्षक श्री .विलास कुलकर्णी सर व विद्यार्थिनींनी ‘भारत हमारी माँ है’ हे गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास प्रमुख सौ .मिनल उदनूर यांनी सादर केले. त्यांनी सांगितले की क्रांतिदिन स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यासाठी आपण साजरा करत आहोत. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे श्री. माणिक आवारे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय सौ. रत्नप्रभा हजारे यांनी करून दिला मा. मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला प्रशालेतील विद्यार्थिनी कु.अवंती अरविंद जाधव सातवी अ, कुमारी साक्षी गायकवाड नववी क यांनी क्रांती दिना विषयी माहिती सांगितली प्रमुख पाहुणे श्री. माणिक आवारे यांनी विद्यार्थिनींना क्रांतिकारकांविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री माणिक आवारे ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटेनवरू ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ. हजारे यांनी केले.