शनिवार, दिनांक १०/०८/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे अत्यंत आनंदाने व उत्साहाने नागपंचमी चा सण साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील, श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागाची पूजा का केली जाते?? कथा आणि प्रत्यक्षात उपयोग याची शास्त्रीय माहिती देण्यात आली.
मुलींनी मातीचे व कणकेचे नाग, कल्पकतेने बनवून आणले होते. त्याचे पूजन करण्यात आले.
इयत्ता चौथी ब च्या विद्यार्थिनींनी नटून थटून ‘मंगळागौर’ या गाण्यावर उत्तम नृत्य सादर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले, फुगड्या घातल्या. शिक्षिका सौ. रश्मी कुलकर्णी यांनी नागपंचमी च्या गाण्यांचे गायन करून या कार्यक्रमाची सांगता केली.