१ली ते ४थी च्या विद्यार्थिनींचे बैठे कवायत प्रकार


आज शुक्रवार, दिनांक १९/०७/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे या नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थिनींचे बैठे कवायत प्रकार घेण्यात आले.

कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल.कवायतीत एकच प्रकारची हालचाल, एकाच वेळी, एका हुकुमावर सर्वांनी करावयाची असते.

कवायतीमुळे विद्यार्थिनींमध्ये शिस्त, सांघिक वृत्ती व आत्मनियंत्रण या गुणांची जोपासना व वाढ होते.