शनिवार, दिनांक १५/०६/२०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींचे स्वागत मा. मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर यांनी औक्षण करून व पेन्सिल भेट देऊन केले. विद्यार्थिनींनी आनंदात व जल्लोषात फुगे सोडले.
मुलींचे स्वागत पाकळ्यांचे उधळण करून करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्य
साधून विद्यार्थिनींनी आणलेल्या विविध रोपांचे लागवण करण्यात आले.
तसेच उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींना शालेय पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. गोड खाऊ देऊन आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.