सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींसाठी शनिवार, दिनांक ०९/०३/२०२४ रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये विद्यार्थीनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
विद्यार्थिनींना त्यांच्या कल्पकतेने रांगोळी काढून, रंग भरणे, सायकल स्पर्धा, मुलींना आवडणारे छंद त्यांना मुक्तपणे खेळण्यास स्वातंत्र्य दिले. सोबत भातुकलीचा खेळ, चेंडू, दोरीच्या उड्या, बॅडमिंटन, बाहुलीचा वाढदिवस, इ. खेळ ज्यामध्ये मुली खेळण्यात दंग झाल्या होत्या.
काही विद्यार्थिनींनी चूल पेटवून चहा तयार केला. पुऱ्या तळल्या आणि भात ही बनवला. ज्याचा आस्वाद शिक्षकांनी व विद्यार्थिनींनी घेतला.
यानंतर विद्यार्थिनींना रुचकर असे जेवण देण्यात आले. अशा आनंददायी प्रकारे मुलींचे शाळेत शिबिर पार पडले.