तगारे बालक मंदिर शाळेमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा


कै.सौ आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन,सोलापूर. दिनांक २३/२/२०२४ रोजी शाळेमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा विषय होता कडधान्यांपासून कोणताही पदार्थ बनवून आणणे गोड किंवा तिखट महिलांनी कडधान्यापासून नाविन्यपूर्ण असे रुचकर पदार्थ बनवून आणले होते. आपापले पदार्थ सजवून घेऊन पालिका शाळेमध्ये आल्या होत्या. आमंत्रित परीक्षक म्हणून आलेल्या काल आणि ताई आणि तांदळे ताई यांनी प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे पाककला स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला.