सेवासदन प्रशालेचा मतदार जनजागृती अभियानांतर्गत मतदान जागृती प्रभात फेरीत सहभाग


सेवासदन प्रशालेतील 5वी ते 9 वी तील विद्यार्थीनींची मतदार जनजागृती साठी ‘आपले मत आपले भविष्य ‘. सर्वांची आहे जबाबदारी, मतदान करू नर नारी ‘ अशाप्रकारच्या घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन शाळेचे बॅनर सहित हुतात्मा पुतळा पार्क चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. सोलापूर शहरातील शाळा सहभागी झाल्या होत्या.


प्रशालेतील शिक्षिका सौ. पायगुडे यांच्यासह प्रशालेतील ११२ विद्यार्थीनीनी प्रभात फेरीत सहभाग नोंदवला. कु कीर्ती गायकवाड कु. नम्रता गायकवाड ,कु. स्नेहल निकम ,कु. राजनंदिनी माने, कु. भूमिका गायकवाड कु. प्रांजली सोमवंशी कु. अनुजा स्वामी कु. प्रणाली अवताडे ,कु.मानसी क्षिरसागर या विद्यार्थिनींनी घोषवाक्यांचे फलक बनवण्यासाठी सहकार्य केले.


रॅलीसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसेयांनी मार्गदर्शन केले.शिक्षक सौ. कविता माने , श्री. जोशी यांनी प्रभात फेरी साठी सहकार्य केले.