विद्यार्थिनींना शालेय साहित्यवाटप


किर्लोस्कर फाउंडेशन,वसुंधरा फाउंडेशन सीएसआर फंडा अंतर्गत प्रशालेतील ५वी ते १०वी तील गरजू होतकरू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी किर्लोस्कर फाउंडेशनचे पदाधिकारी श्री. ऋषिकेश कुलकर्णी, सेवासदन संस्थेच्या सचिवा सौ. वीणा पतकी मॅडम व प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रत्नप्रभा हजारे यांनी केले.