स्व. रमाबाई रानडे पुरस्कार वितरण तसेच शताब्दी स्मरणिका प्रकाशन सोहळा


पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या रमाबाईसाहेब रानडे पुरस्क्रार प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांना मंगळवारी डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सेवासदन शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते थाटात करण्यात आले.यावेळी सुहासिनी शहा यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. शेकडो कलाकारांना व्यासपीठ मिळवून देत पुरस्काराने सन्मानित केले आहे. अनेकांना पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या डॉ. सुहासिनी शहा यांना आज आम्ही सन्मानित केले आहे याचा आनंद वाटतो असे मत पुणे सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे यांनी व्यक्त केले.

पुरस्कार वितरणानंतर ‘अक्षरभेट शतकाची’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या संकेतस्थळाचेही उद्‌घाटन डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या संकेतस्थळाचेही उद्‌घाटन डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुहासिनी शहा यांची प्रकट मुलाखत अश्‍विनी मोरे – वाघमोडे यांनी घेतली.

स्मरणिकेचे अनोखे प्रकाशन

सेवासदन संस्थेतर्फे स्मरणिकेचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. सेवासदन संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रकाशित केलेल्या स्मरणिकांच्या प्रती पालखीत ठेवून छोट्याशा मिरवणुकीने आणण्यात आल्या. या पालखीसोबत रमाबाई रानडे तसेच इतर मान्यवरांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

यावेळी डॉ. सुहासिनी शहा यांची प्रकट मुलाखत अश्मिगी मोरे – वाघमोडे यांनी घेतली. डॉ. शहा म्हणाल्या, नोकरी, व्यवसाय असो की सामाजिक कार्य, बदल स्वीकारला तर प्रगतीची द्वारे खुली होतात. जीवनात यशस्त्री होण्यासाठी पैशांबरोबर वेळेचेही व्यवस्थापन करणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात पर्यावरण, नद्या रुंदीकरण आदी विषयातही प्रिसिजन फाउंडेशन कार्य करेल, असेही डॉ. सुहासिनी शहा यांनी याप्रसंगी सांगितले.