ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेता यावे या उद्देशाने मुलींच्या निवासी शिक्षणाची सोय पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूर येथे आहे. या वसतीगृहामध्ये 5 वी ते 12 वी पर्यंतच्या जवळपास 200 मुलींची निवासी सोय असून इथे अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये मुली आपले शिक्षण घेतात.