सुरजाबाई रामलाल मुलींची प्रशाला,
सेवासदन, सोलापूर.

_
सौ.राजश्री रणपिसे
मुख्याध्यापिका (MSC.MED.DSM)

थोडक्यात आमच्याविषयी :-

१३,२३८ Sq.ft. जागेत विस्तारलेली सेवासदन शाळा, सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेली आहे. शाळेची अशी ख्याती आहे की, सेवासदन शाळा ही विदयार्थिनीच्या समग्र विकासांना केंद्रीभूत मानून त्यांना एक जबाबदार, सुजाण नागरिक घडविण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्नशील असते. जरी सेवासदन प्रशालेने राष्ट्रीय ध्येय धोरणेप्रती आदर दर्शवत त्यांची अंमलबजावणी करण्याचा सदैव प्रयत्न करताना विद्यार्थिनींच्या सर्वंकष उत्कर्षांना अग्रस्थानी स्थान दिले आहे, तरीही पारंपारिक, सांस्कृतिक, नैतिक मूल्ये यांची सदैव कास धरतो आहे. आमचे उत्कृष्ट अध्यापक वर्ग एकात्मिक दृष्टिकोनाचा अवलंब करत सक्षमतेने अध्यापन करत असताना प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिकरित्या लक्ष देवून त्यांच्यामध्ये विविधांगी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

 

विद्यार्थिनामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करून त्यांना उज्ज्वल असे शैक्षणिक ध्येये साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करणे, विद्यार्थिनीमध्ये ज्ञानप्राप्तीची तळमळ, लेखन आणि संभाषण कौशल्यामध्ये प्राविण्य प्राप्ती आणि सारासार विचार करण्याची क्षमता विकसित करणे, विद्यार्थिनीमध्ये २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्य प्राप्तीसाठी साहाय्य करणे,  सामाजिक, नैतिक मूल्यांची जोपासना करणे आणि जागतिक नागरिकत्वाविषयी आदर करणे अशा प्रकारच्या गुणसंवर्धनासाठी आमची प्रशाला नेहमीच प्रयत्नशील असते. आमच्या संस्थापिका कै. रमाबाईसाहेब रानडे यांनी पाहिलेले सेवासदन प्रशालेचे चे चित्र,सत्यात उतरवण्याचा प्रयत्न प्रशाला करत असते.

मुख्याध्यापिकेचा संदेश :-

एपीजे अब्दुल कलाम यांच्या शब्दात,
"शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, उद्योजकता आणि नैतिक नेतृत्वाची क्षमता निर्माण केली पाहिजे आणि त्यांचे आदर्श बनले पाहिजे."

 

श्रीमती रमाबाई रानडे आणि गोपाळ कृष्ण देवधर यांनी 1909 साली पुण्यात सेवासदन संस्थेची स्थापना केली. आज या ऐतिहासिक संस्थेने स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात 100 हून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत. तो काळ होता जेव्हा मुलीला ‘शिक्षणाचा हक्क’ नाकारला जात होता.

 

या वर्षांमध्ये एक चांगली माहिती देणारी आणि भावनिकदृष्ट्या सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी आधुनिक अध्यापन-शिक्षण तंत्रज्ञानासह मूल्य आधारित शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करून शाळेने केलेली प्रगती लक्षात घेऊन आम्हाला खूप समाधान वाटते. आणि मी सर्व पालकांना खात्री देते की येणाऱ्या काळात आम्ही हा प्रवास सर्व भारदस्त उत्साहाने आणि निर्धाराने सुरू ठेवू आणि शिकणाऱ्या तरुण पिढीला सर्वांगीण शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ.

 

एस. आर. गर्ल्स हायस्कूल सेवासदन, सोलापूर येथील अतिशय सक्षम शिक्षकवृंद जो खूप व्यावसायिक आहे आणि वैयक्तिक क्षेत्रात कौशल्य असलेले शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करतात आणि त्यांच्या उणीवा दूर करण्यासाठी प्रोत्साहित करतात. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” चे मॉड्यूल लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना शिकवण्याच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी समान संधी देण्यात आली आहे, “मन चंदनाचे परी त्व झिजवे” या वाक्यावर आमचा ठाम विश्वास आहे.

 

आम्ही विश्वास ठेवतो की योग्य दृष्टी असलेली टीमच यशाची शिखरे गाठू शकते ज्याची प्रत्येक संस्था आकांक्षा बाळगते.

धन्यवाद आणि विनम्र अभिवादन.

दृष्टीकोन आणि ध्येयः

दृष्टीकोन

पुणे सेवासदन संस्थेच्या सोलापूर शाखेने ऑक्टोबर १९२३ मध्ये सु. रा. मुलींची प्रशाला, सेवासदनची स्थापना केली. जागतिक पातळीवर मान्यता पावलेली भारतीय मूल्ये, संस्कार यांवर भर देत विदयार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच शाळेचे उद्दिष्ट आहे. शाळेने दिलेल्या संस्कारांमधूनच नवीन पिढी /तरुण मने विश्वशांतीचा दूत म्हणून काम करण्यास सज्ज होतील, धर्म, जात, पंथ, वर्ण यांसारख्या सामाजिक अडसरविरहित समाजनिर्मितीमध्ये त्या काम करतील आणि फक्त मानवता हाच त्यांचा धर्म असेल. 'मना चंदनाचे परि त्वां झिजावे' या सेवासदन संस्थेच्या बोधवाक्याप्रमाणे त्या वर्तन करतील.

ध्येय

आजच्या स्पर्धेच्या युगातील आव्हांनाना तोंड देण्याच्यादृष्टीने विदयार्थिनीच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, जेणे करून त्यांच्या पुढील आयुष्यातही प्रत्येक टप्यावर त्या धैर्याने आणि निर्भयपणे उभ्या राहतील. अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ज्यामुळे विदयार्थ्याच्या शैक्षणिक संकल्पना पक्क्या होऊन त्या त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. आमचा हेतू केवळ विदयार्थिनीना शैक्षणिक गरजांची पूर्ती करणे इतकाच नसून मानवजातीच्या उन्नतीसाठी भावी आयुष्यात काम करण्यासाठी त्यांना घडवणे हे आमचे ध्येय आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार,सामाजिक द्वेष, वैरभावना अविश्वास यांच्यापासून मुक्त असलेला सुदृढ समाज निर्माण होईल. हेच उच्च ध्येय /दृष्टीकोन घेऊन सेवासदन प्रशाला सध्या सोलापूरातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून नावाजली जात आहे.

प्रशालेत विद्यार्थीनींसाठी असलेल्या सोयी-सुविधा:

स्मार्ट क्लास :- शाळेमध्ये प्रशस्त आणि भरपूर प्रकाश त्याचप्रमाणे गरजेनुसार आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी लवचिक फर्निचर असलेल्या वर्गखोल्या आहेत.

खेळ :- विदयार्थिनीना खेळण्यासाठी मैदान आहे. सर्व विदयार्थिनीना संघामध्ये तसेच वैयक्तिक खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. सांघिक खेळ तसेच वैयक्तिक खेळ शिकण्यासाठी शारीरिक शिक्षणाचे पात्र शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित केले जाते. तसेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. आजपर्यंत अनेक विद्यार्थिनी राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत चमकल्या आहेत.

ग्रंथालय :- पुस्तके, नियतकालिके, मासिके, विश्वकोश अशी भरपूर विपुल साहित्य असलेले, वैविध्यपूर्ण, अभ्यासाची पुस्तके यांचा समावेश असलेले समृध्द, सुसज्ज ग्रंथालय आहे.

वैद्यकीय सुविधा :- आमच्या शाळेतील प्रत्येक विदयार्थिनींची वेळोवेळी वैदकीय दृष्टया तपासणी केली जाते आणि पालकांना त्याची माहिती दिली जाते.

संगणक प्रयोगशाळा :- आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. त्यासाठी शाळेत संगणक उपलब्ध आहेत. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत पर्यंत श्रेणीबद्ध
पद्धतीने संगणक अभ्यास घेतला जातो. आमची संगणक प्रयोगशाळा सुसज्ज आहे. त्यामध्ये आधुनिक संगणक LAN (Land Area Network) व्दारे जोडले
आहेत आणि नजिकच्या काळाची गरज ओळखून शाळेमध्ये (Broadband Connection) घेतले आहे. ज्यामुळे यांच्या व्यावसायिकीकरणाची क्षमता वाढेल. प्रत्येक संगणकाला स्वतंत्र बँकिंग आणि कॉम्पॅक्टेड लॅब प्रोजेक्टर आणि स्क्रीन मल्टीमिडीयासाठी उपलब्ध आहे.

विज्ञान प्रयोगशाळा :- आजच्या युगामध्ये अदययावत व उच्च दर्जाची विज्ञान प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे. अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दाखवलेले प्रयोग, विद्यार्थिनींनी केलेले प्रयोग यामधून त्यांना विज्ञानाचे जास्त ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे शिकलेले ज्ञान अधिक काळ लक्षात ठेवण्यासाठी विद्यार्थिनी सक्षम होतात.


भाषा प्रयोगशाळा :- शाळेमध्ये विदयार्थिनीसाठी भाषेची प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. शाळेमध्ये विदयार्थिनीसाठी भाषेची प्रयोगशाळा तयार करण्यात
आली आहे. यामध्ये इंग्रजी,मराठी, हिंदी, संस्कृत आदी भाषांचा समावेश आहे. भाषेचा अचूक उच्चार शिकवणे,शैक्षणिक साहित्याचा वापर करून भाषेचे
रंजकरित्या अध्यापन करणे इत्यादी उद्देश नजेरेसमोर ठेऊन या प्रयोगशाळा तयार केल्या आहेत. व त्या विषयाची आवड विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

सामाजिक अभ्यास खोली :- विद्यार्थिनीना इतिहास, भूगोलाची ओळख व या विषयामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी या अभ्यास खोलोची निर्मिती झाली.
सामाजिक अभ्यासाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या आर्थिक समस्यांचे उपाय विदयार्थिनी शोधतात.

गृहशास्त्र / कार्यानुभव:- यामध्ये विदयार्थ्याच्या सर्जनशीलतेची देवाणघेवाण करण्याचे उद्दीष्टे आहे. प्रत्यक्ष मूलभूतपाककला प्रशिक्षण दिले जाते.कौटुंबिक तसेच व्यावसायिकदृष्ट्या या मूलभूत शिक्षणाचा उपयोग मुलींना होतो.

गणित प्रयोगशाळा :- गणितीय संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून आणि प्रयोग करून विद्यार्थिनींना उलगडाव्यात म्हणून प्रशालेत गणित प्रयोगशाळा आहे. प्रत्यक्ष
अनुभवातून / कृतीतून शिक्षण हे ध्येय बाळगून या प्रयोगशाळेची निर्मीती करण्यात आली आहे.

कलादालन :- प्रशालेत भव्य असे कलादालन असून विद्यार्थिनींच्या कल्पक, सृजनशील आणि अमूल्य अमूर्त कलेस चालना मिळावी म्हणून सातत्याने चित्रकला विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाते.

श्रुति गंधार संगीत वर्ग :- संस्थेच्या वतीने चालविल्या जाण्याच्या गायन, वादन वर्गात प्रशालेतील विद्यार्थिनी प्रतिवर्षी सहभागी होतात आणि उत्तम यश मिळवितात. कु.श्रुति विश्वकर्मा ही विद्यार्थिनी शास्त्रीय गायनात आज राष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते.

शैक्षणिक जगतापलीकडे:

परिचय :- विदयार्थिनीमधील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देण्यास मदत करणे. आम्ही विदयार्थिनीना नानाविध छंदांची ओळख करून ते जोपासण्यास मदत करतो जसे पाठांतर, सर्जनशील लेखन, काव्यलेखन, भेटकार्ड बनविणे, चित्रकला, गायन, शिवणकला, नृत्य, कला कौशल्य, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा,नवनवीन पुस्तकांचे वाचन, बालनाटय प्रयोग, हस्तकला इ. शाळेच्या प्रत्येक दिवसाची सुरूवात सामूहिक परिपाठाने होते. सर्व विदयार्थिनी आणि शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असते. परिपाठाच्या माध्यमातून विदयार्थ्यांना सर्वांपुढे येऊन बोलण्याची संधी दिली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. परिपाठामध्ये शिक्षक आणि विदयार्थी विविध नैतिक कथा, बोधकथा सांगतात, ज्याद्वारे विदयार्थिनीवर उत्तम संस्कार घडतात. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा, संस्कृत दिन, क्रांती दिन, बालदिन, हिंदी दिन, जागतिक मराठी दिवस अशा कार्यक्रमाच्या वेळी नेहमी समाजातील विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित गुणवंत व्यक्तींना शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभही विद्यार्थिनी व शिक्षकांना होतो.

गटचर्चा :- सुरुवातीला वर्गात शिकवताना विदयार्थिनीचे गट पाडले जातात त्यांना एखादी पूर्वनियोजित विषय देऊन चर्चा करण्याची, मत मांडण्याची संधी ही दिली जाते. तसेच अनौपचारिकरित्या म्हणजे आयत्या वेळी एखादा विषय देऊन हो गट चर्चा घडविल्या जातात.

शैक्षणिक सहली / क्षेत्र भेटी :- विदयार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी. बाह्य जगताचे ज्ञान होण्यासाठी, प्रशाले तर्फे विविध शैक्षणिक सहली, क्षेत्र भेटी, अभ्यास भेटीचे आयोजन दरवर्षी केले जाते. सर्व सहली विद्यार्थिनींच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असतात तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे आयोजन केले जाते.

शालेय शिस्त: शालेय शिस्त हाच शालेय व्यवस्थापनाचा कणा मानला जातो. त्यामुळेच शाळेत स्वयंशिस्तीवर भर देण्यात आला आहे. शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन अतिशय सुसंघटित व शिस्तबध्द आहे. शाळेच्या कामकाजाच्या सर्व नोंदी नियमित अद्ययावत असतात. शाळेतील कोणतीही समस्या / प्रश्न / तक्रारी प्राधान्याने आणि बिना विलंब करता अडचणी सोडविल्या जातात.

कुमुदिनीबाई गोविंदजी दोशी सांस्कृतिक कला मंदिर :- सोलापूर शहराचे आकर्षण असणारे, नाटय कलावतांचे माहेरघर असणारे कला मंदिर हे शाळेचे बलस्थान आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन या रंगमंचावरून होते.

रानफूल योजना :- समाजातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रेरित करणे तसेच प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवणे या हेतून गेली अनेक वर्षे रानफूल योजना कार्यान्वित आहे. यामध्ये शिक्षकांसोबत विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. यशोदानंद दत्तक पालक योजना : इ. १० वीच्या विद्यार्थिनीसाठी ही खास योजना आहे. प्रशालेतील प्रत्येक शिक्षकांस दहा विद्यार्थिनी वर्षभरासाठी दत्तक दिल्या जातात. त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा करणे, येणाऱ्या अडचणी सोडवणे, अधिक अभ्यास करण्यास प्रेरीत करणे आणि शिक्षक- विद्यार्थिनी यांच्यातील पालकत्वाचा बंध दृढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे.

यशोदानंद दत्तक पालक योजना :- इ. १० वीच्या विद्यार्थिनीसाठी ही खास योजना आहे. प्रशालेतील प्रत्येक शिक्षकांस दहा विद्यार्थिनी वर्षभरासाठी दत्तक दिल्या जातात. त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा करणे, येणाऱ्या अडचणी सोडवणे, अधिक अभ्यास करण्यास प्रेरीत करणे आणि शिक्षक विद्यार्थिनी यांच्यातील पालकत्वाचा बंध दृढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

शालेय समिती व्यवस्थापन :- संस्था पदाधिकारी, प्रशाला प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर प्रतिनिधी या सर्वांच्या समन्वयाने व सहकार्याने शालेय समिती कार्यरत आहे. प्रशासकीय कार्याचे नियमन करणे, प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण निर्णय घेणे व त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी शालेय समिती महत्त्वाची आहे.

शालेय समिती सदस्य २०२२-२३:
  • १. मा. श्री. उमेश मराठे (शालेय समिती अध्यक्ष)
  • २. मा. श्रीमती. शीला मिस्त्री (सदस्या)
  • ३. मा. श्रीमती. विजया निसर (सदस्य)
  • ४. मा. श्री. श्रीकांत येळेगावकर (सदस्य)
  • ५. मा. डॉ. शिरीष गोडबोले (निमंत्रित)
  • ६. मा. श्री. अमोल चाफळकर (निमंत्रित)
  • ७. मा श्रीम. अश्विनी गानू (निमंत्रित)
  • ८. मा. वीणा पत्की (सदस्या)
  • ९. मा. राजश्री रणपिसे (मुख्याध्यापिका)
  • १०. मा. संध्या सुतार (शिक्षक प्रतिनिधी)
  • ११. मा. महादेवी कोळी (शिक्षकेतर प्रतिनिधी)

पालक संघ :- शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा विकास शक्य आहे यासाठी प्रतिवर्षी पालक संघ स्थापना केला जातो .प्रशालेच्या विविध उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जाते शाळा आणि सर्व पालकवर्ग यांच्यातील दुवा म्हणून प्रत्येक इयत्तेचे पालक प्रतिनिधी महत्वाची भूमिका बजावतात.

पालक समिती २०२२-२३:
  • १. श्री.अनंत पांडुरंग तेरकर (अध्यक्ष)
  • २. सौ.सविता हनुमंत देशमुख (उपाध्यक्ष)
  • ३. सौ.रुपाली अप्पा गवळी (सचिव)
  • ४. सौ.सुवर्णा महादेव शिंदे (सदस्य)
  • ५.सौ.ऋतुजा गिरीष शहाणे (सदस्य)
  • ६.सौ.स्नेहल सचिन कटारे (सदस्य)
  • ७.सौ.पूनम सुधीर ठाकूर (सदस्य)

कर्मचारीवृंद

_

सौ. राजश्री रणपिसे

मुख्याध्यापिका
MSC.MED.DSM

सौ. स्वाती पोतदार

पर्यवेक्षिका
MA B.ED DSM

सौ. संध्या सुतार

शिक्षिका
M.SC. B.ED

सौ. मीरा जमादार

शिक्षिका
B.A. B.ED.

श्री. ज्ञानेश्वर काळे

शिक्षक
M.A. B.P.ED

सौ. शैलजा खांडेकर

शिक्षिका
B.A. B.ED

सौ. गीतांजली पेशवे

शिक्षिका
M.SC B.ED

श्री. विलास कुलकर्णी

संगीत शिक्षक
M.A. B.ED

श्री. देवेंद्र अयाचित

क्रीडा शिक्षक
B.SC M.P.ED

श्री. सुधीर देशमुख

शिक्षक
M.A. B.SC B.ED

श्री. गंगाधर जोशी

कलाशिक्षक
SSC ATD AM

सौ. मीनल उदनूर

शिक्षिका
M.A. B.ED

श्री. अमित देशपांडे

शिक्षक
M.A. B.SC B.ED

सौ. स्वप्ना सहस्रबुद्धे

शिक्षिका
DEMO

सौ. अश्विनी वाघमोडे

शिक्षिका
M.A. B.ED

श्रीमती. अंजली शिरसी

शिक्षिका
M.A. B.ED DSM

सौ. वंदना लामतुरे

शिक्षिका
M.A. D.ED

सौ. लक्ष्मी कमळे

शिक्षिका
M.A. D.ED

सौ. प्रीती मेकाले

शिक्षिका
B.A. D.ED.

श्री. सतीश घंटेनवरु

शिक्षक
M.A. B.ED

श्री. रेवणसिद्ध कट्टे

शिक्षक
B.A. D.ED.

सौ. प्रिया निघोजकर

शिक्षिका
Demo

सौ. रुपाली काळे

शिक्षिका
Demo

सौ. स्मिता कोर्टीकर

शिक्षिका
B.A. D.ED

सौ. अर्चना नाईक

शिक्षिका
B.A. B.P.ED

सौ. धनश्री ढुमे

शिक्षिका
B.A. B.ED.

सौ. रत्नप्रभा हजारे

शिक्षिका
Demo

सौ. अर्चना भुजबळ

शिक्षिका
B.A. B.ED

सौ. वृषाली डोंगरे

शिक्षिका
B.A. D.ED

श्री. जयवंत दुरूगकर

शिक्षक
B.A. D.ED.

सौ. रत्नप्रभा हजारे

शिक्षिका
Demo

सौ. संतोषी सुरवसे

शिक्षिका
B.A. B.ED

सौ. बारभाई

शिक्षिका
Demo

सौ. पायगुडे

शिक्षिका
Demo

सौ. कविता माने

शिक्षिका
Demo

सौ. महादेवी कोळी

शिक्षिका
M.A.

श्रीमती दीपाली कुलकर्णी

शिक्षिका
B COM

श्री. विजय रजपुत

शिक्षक
B.A.

श्री. शिवानंद फुलारी

शिपाई
SSC

श्री. सूरज कांबळे

शिपाई
BA

सौ. यशोदा शिंदे

Demo
Demo