सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शिक्षक दिन साजरा


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शिक्षक दिन अत्यंत आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या दिवशी इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींना शिक्षक होण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी पहिली ते तिसरीच्या वर्गात जाऊन नीट तयारी करून अध्यापन केले. छोट्या मुलांनीही नवीन शिक्षकांकडून शिकताना खूप आनंद व्यक्त केला. विद्यार्थी – शिक्षकांनी इंग्रजी पाढे घेतले, छान – छान गोष्टी सांगितल्या, कवितेचे चालीवर, कृतीयुक्त गायन घेतले. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव तसेच शिक्षकांच्या कार्याबद्दल आदर निर्माण झाला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी शिक्षकांना केक देऊन शेवट गोड करण्यात आला. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनाही या निमित्त खाऊ देण्यात आले.

यामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.