सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन


भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट निमित्त सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर आकर्षक कवायत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तालबद्ध पावलांनी, शिस्तबद्ध हालचालींनी आणि देशभक्तीच्या ओजस्वी भावनेने ही कवायत सादर करण्यात आली.

या सादरीकरणातून विद्यार्थिनींमध्ये देशप्रेम, एकात्मता व शिस्त या मूल्यांचा संदेश देण्यात आला.

मा. मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर, श्रीमती सुरेखा घाटेकर व सौ. रश्मी कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या देशभक्तीपर कवायतीचे कौतुक करून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला.