मंगळवार, दि १/७/२०२५ रोजी सेवा सदन बालवर्गा येथे नाना पाठक सभागृहात नर्सरी,छोटा गट,मोठा गट यांची शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पालक सभा घेण्यात आली या सभेला मा. सचिव वीणा पतकी,शालेय समिती अध्यक्ष अँड अर्चना जोशी, मार्गदर्शक सौ.मंजुषा राठी, माननीय मुख्याध्यापिका मनिषा दिकोंडा यांची उपस्थिती होती. या सभेत पालकांना शाळेचे नियम, वेळ, सूचना यांची माहिती मुख्याध्यापिका यांनी दिली तसेच शाळेचा अभ्यासक्रम उपक्रम परीक्षा यांची माहिती सर्व शिक्षकांनी दिली सौ. मंजुषा राठी यांनी पालकांशी चर्चा केली. पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अशाप्रकारे पालक सभा संपन्न झाली.
