तगारे बालक मंदिर येथे आषाढीनिमित्त दिंडी संपन्न


कै. सौ. आनंदीबाई द.तगारे बालक मंदिर सेवासदन सोलापूर. बाल वर्गाच्या वतीने शनिवार दि ५/७/२०२५ रोजी विठू नामाच्या जयघोषित चैतन्यमय अशा वातावरणात आषाढी दिंडी काढण्यात आली. संस्थेच्या सचिवा माननीय विणा पतकी,शालेय समिती अध्यक्ष ॲड. अर्चना जोशी, मार्गदर्शक सौ मंजुषा राठी, मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात दिंडीचे आयोजन केले.

संमती कट्टा ते विठोबाचे मंदिर असा या सोहळ्याचा मार्ग होता यासाठी मोठ्या गटातील मुलींचा सहभाग होता. पालक प्रतिनिधी गणेश गुरुसिद्ध मनुरे व मार्गदर्शक शिक्षिका मंजुषा राठी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. विविध अभंग भजन म्हणण्यात आले दिंडी सोहळ्यात विठ्ठल,रुक्मिणी,सोपानदेव, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जनाबाई,वासुदेव या वेशभूषेतील बालमंडळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले दिंडी संपल्यावर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला अशा प्रकारे सिद्धरामेश्वराच्या मंदिरात दिंडी संपन्न झाली.