सेवासदन प्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निवेदक अभिराम सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


सेवासदन प्रशालेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम निवेदक अभिराम सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यानिमित्त प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेचे गायन शिक्षक विलास कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनींनी गुरुभजन सादर केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सेवासदन संस्था अध्यक्ष शीला मिस्त्री, संस्था सचिव वीणा पतकी, माध्यमिक विभागाच्या शालेय समिती अध्यक्ष विदया लिमये, प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार यांच्या हस्ते आदयगुरू महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्रावणी सोनाग्रा हिने गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरुचे आयुष्यातील स्थान भाषणातून मांडले, प्रणाली विनोद खरात या विद्यार्थिनींनी गुरु पौर्णिमेच्या शुभदिनी ९ वी क च्या गरीब विद्यार्थिनीला पुस्तकांचा संच देऊन मदत केल्याबद्दल प्रशालेतर्फे तिचे कौतुक करण्यात आले. शिक्षक प्रतिनिधी मीरा जम ादार उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सतीश घंटेनवरू यांनी करून दिला सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्चना नाईक यांनी केले.