सोलापूर-सेवासदन प्रशाला येथे आषाढातील प्रथम दिन म्हणजेच कालिदास दिन व राजर्षी शाहू महाराज जयंती प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विदयार्थिनीनी सादर केलेल्या स्वागत करूया सकल जनांचे आनंदाने उत्साहाने या गतगीताने प्रमुख पाहुणे श्री. आनंद कुलकर्णी व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार यांनी सांगितले की कालिदास दिन व राजर्षी शाहू महाराज जयंती योगायोगाने एकाच दिवशी आली आहे. महाकवी कालिदासांचा प्रत्येक ग्रंथ हा खूप महान आहे राजर्षी शाहू महाराज प्रजाहितदक्ष होते. महाकवी कालिदास व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाहुणे श्री. आनंद कुलकर्णी यांची ओळख सहशिक्षिका स्वप्ना केळकर यांनी करून दिली. पर्यवेक्षिका प्रास्ताविकात हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ८वी मधील कु. आर्या सुरडे व ९वी मधील कु. प्रज्ञा गुंड यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली राजर्षी ‘शाहू महाराज काय वर्णू तुमचे गुणगान महाराष्ट्राच्या मातीत घडवले पैलवान अशा राजाचा आम्हास अभिमान। ‘अशा शब्दांत माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. प्रमुख पाहुणे आनंद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात कालिदास सौ. स्वाती पोतदार यांच्या यांच्या जीवन व ग्रंथसंपदेविषयी मौलिक माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इतिहास प्रमुख सौ. मीनल उदनूर मराठी इतिहास संस्कृत विषय शिक्षकांनी सहकार्य केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री आनंद कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी मीरा जमादार, मराठी विषय प्रमुख सतीश घंटेनवरू, शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन सौ. दिपाली बोरसे यांनी केले.










