आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शाळेत सर्व विद्यार्थिनी व शिक्षकांनी विविध प्रकारचे आसन, प्राणायाम, योगासने केली. व्यायामाचे महत्त्व, योग दिनाचे महत्त्व,वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आला. विद्यार्थिनींना त्यांच्या वयात उपयोगी व सोपी असन आणि भ्रमरी, ताडासन, योग प्रार्थना शिकवण्यात आले. त्यांना दररोज योगासन व व्यायामाचे फायदे सांगण्यात आले.
सौ पुनम ठाकूर सौ अनुजा कुलकर्णी त्यांनी विद्यार्थिनी कडून काही आसनाचे प्रकार करून घेतले. त्यांचे अनुकरण करून सर्व आसन केले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने आनंदाने आसन व व्यायामाचे प्रकार केले. आपल्या शरीराची लवचिकता किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थिनींच्या लक्षात आले. कार्यक्रमानंतर पौष्टिक राजगिरा लाडूचा खाऊ देण्यात आला.

