सेवासदन प्रशाला सोलापूर येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा


जागतिक योग दिनानिमित्त सेवासदन संस्था येथील बालवर्ग, प्राथ मिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी योगाचे प्रात्यक्षिक व योगासने केली. कार्यक्रमाच्या सेवासदन संस्था सचिव सौ.वीणा पतकी, योगसाधना मंडळ सोलापूर च्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.योगसाधना मंडळ सोलापूर चे अध्यक्ष रोहिणी उपळाईकर, कार्याध्यक्ष नागनाथजी पाटील , मुख्यकार्यकारी सदस्य रमेशजी सोनी ,अँड. योगीराज कलबुर्मे वीणा रेळेकर , शहनाज चामडिया , मनिषा औरंगाबादकर, सुनिल माढेकर, स्नेहा कामतकर, निवेदिता गायकवाड, जयश्री उमर्जीकर, अनिता मोहिते,उषा दस्तूरकर डॉ. घनश्याम साखरे, सपना मेरगु , उमा झिंगाडे , मनीषा बडवे , अश्विनी बाळगी ,उषा चव्हाण ,ज्योती झिपरे यांच्या योगसाधना मंडळातर्फे सेवासदनच्या विद्यार्थिनींकडून वज्रासन, हलासान,वृक्षासन, चक्रासान यांसारखे अनेक योग प्रकार करण्यात आले . सर्व विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थिनी यांनी जागतिक योग दिन निमित्त योगासने केली .

योगसाधना मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी उपळाईकर , योगगुरू पुरस्कार प्राप्त उमा झिंगाडे व इन न्यूज टी . व्ही .चॅनेल चे पत्रकार गिरीश मंगळूरकर यांचा सत्कार मा . वीणा पतकी यांच्या हस्ते करण्यात आला . सचिव सौ . वीणा पतकी यांनी विद्यार्थिनींना योग दिनाच्या व संगीत दिनाच्या शुभेच्छा दिल्या व योग केल्याने स्वस्थ व निरोगी जीवन प्राप्त होते . योगा प्राणायाम यांचा सराव करून आनंदी व सुखी जीवन जगा , असा संदेश दिला . संगीत शिक्षक विलास कुलकर्णी यांनी संगीत दिनानिमित्त सुंदर अभंग सादर केला . कु राजनंदिनी कोरे व विद्यार्थिनींनी संगीताच्या तालावर योगाचे प्रकार केले .
सेवासदन संस्थाच्या चिटणीस सौ. वीणा पतकी , कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य श्री. सतीश कुलकर्णी , माध्यमिक विभाग प्रमुख सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, प्राथमिक विभाग विभाग प्रमुख सौ . संजीवनी नगरकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती मीरा जमादार ,शिक्षक बंधुभगिनी , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे नियोजनासाठी क्रीडाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर काळे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचलन योगसाधना मंडळाचे प्रशिक्षक ॲड. योगीराज कलबुर्मे यांनी केले .