सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये विद्यार्थिनींचे जोरदार स्वागत


दि. 16 जून 2025 रोजी शाळेच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली.

★दिवसाची सुरुवात ही परिपाठाने झाली.

★पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

★पहिलीच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात म्हणून त्यांच्या चिमुकल्या पायांचे ठसे घेण्यात आले.
त्यांचा बालउत्साह आणखी वाढावा म्हणून बाहुली भेट देण्यात आली.
★याप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थिनींना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.तसेच जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली.
★मागील वर्षी ATS परीक्षेमध्ये नावीन्य प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींचा शाळेकडून गौरव करण्यात आला.

विद्यार्थिनींना खाऊ देण्यात आला.पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थिनीं आनंदी व उत्साही दिसत होत्या.