सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एमएचटी-सीईटी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रज्ञा दादाराव डांगे (९९.६९ पसेंटाइल), भक्ती शंकर कल्पवृक्ष (९९.६५ पसेंटाइल), प्रणिता पृथ्वीराज राठोड (९३.७६ पर्से टाइल) आणि जान्हवी संजय घुले (९१.४६ पसेंटाइल) या विद्यार्थिनींनी या परीक्षेत यश मिळवले आहे. यापूर्वीही सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जेईई परीक्षेत उज्ज्वल कामगिरी केली होती. महाविद्यालयातील शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच हे यश मिळाल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
पुणे सेवासदन संस्थेच्या सोलापूर शाखेतील मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिव वीणा पतकी, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, संचालक विद्या लिमये, पद्माकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे, प्रा. सुजाता उपासे, प्रा. सविता मादळे, प्रा. नम्रता म्याना, सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

