बारावी बोर्ड परीक्षेत सेवासदन कनिष्ठमहाविद्यालयाचे नेत्रदीपक यश


सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.२७ टक्के, वाणिज्य शाखेचा ९० टक्के तर कला शाखेचा ७७ टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातील ९ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य, २१ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत तर ६१ विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. विज्ञान शाखेची प्रज्ञा डांगे हिने ८४.५० टक्के गुण घेऊन महाविद्यालयात आणि विज्ञान शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. पूजा नामदेव ढवळे या विद्यार्थिनीने ८१.८३ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात द्वितीय आणि वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. मानसी संतोष गायकवाड या विद्यार्थिनीने ८१ टक्के गुण मिळवत महाविद्यालय तृतीय क्रमांक तर कला विभागात प्रथम क्रमांक मिळविला.

महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल- कला शाखा : प्रथम मानसी गायकवाड (८१ टक्के), द्वितीय राणी शिंदे (७४.६७). वाणिज्य : प्रथम पूजा ढवळे (८१.८३), द्वितीय तृप्ती चोपडे (७८). विज्ञान : प्रथम प्रज्ञा डांगे (८४.५०), द्वितीय भक्ती कल्पवृक्ष (८०.३३). यावेळी गुणवंत विद्यार्थिनींचा प्राचार्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, शालेय समिती अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, सचिव सौ. वीणा पतकी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे यांनी अभिनंदन केले.