परिपाठ आमुचा रोजचा, शाळेचा तो शिरपेच।
शिस्त, ज्ञान व मूल्ये, देतो आम्हाला नित्य।।
प्रार्थना, गीत, सुविचार, नवे काही शिकवी।
एकत्र येऊनी विद्यार्थी, आनंदाने रमवी।।
या ओळींप्रमाणे सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे शाळेची सुरुवात आनंददायी आणि शिस्तबद्ध परिपाठाने होते.
आज बुधवार, ०५/०३/२०२५ रोजी इयत्ता २ री अ मधील कु. श्रुती रविकांत कांबळे या विद्यार्थिनींनी तिच्या वाढदिवसानिमित्त वर्गासाठी गोष्टीची पुस्तके भेट म्हणून दिली.


