सेवासदन प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन अभिज भानप आणि संस्थेच्या सचिव वीणा पतकी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विज्ञान गीत संगीत शिक्षक विलास कुलकर्णी व विद्यार्थिनीनी सादर केले. सादर केले. सेवासदन प्रशाला येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर अभिज भानप सेवासदन संस्था सचिव वीणा पतकी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे अभिज भानप यांचा परिचय प्रशालेतील शिक्षिका अर्चना राऊत यांनी करुन दिला. उरोबोटच्या साहाय्याने रोबोटच्या हातात बुके देऊन रिमोटच्या साहाय्याने रोबोट चालत येऊन बुके प्रदान करण्यात आला तसेच ड्रोनच्या साहाय्याने फ गे उडवून वैज्ञानिक उपकरणांचा आधुनिक तंत्रज्ञाना चा उपयोग करता येतो, असा संदेश देण्यात आला. ८ वी व च्या विद्यार्थिनींनी वैज्ञानिक नाटिका’ अंधश्रद्धा नको नको’ सादर केली. मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पर्यवेक्षिका स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटेनवरू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक संध्या सुतार, श्रुती मोहोळकर, स्मिता कोर्टीकर, वैशाली काळे, अमित देशपांडे, सुधीर देशमुख, रेवणसिद्ध कट्टे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार अमित देशपांडे यांनी मानले.