‘चला संस्कृती जपूया’ प्रसिद्ध व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचा कार्यक्रम सेवासदन प्रशाला येथे संपन्न


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली . प्रमुख पाहुणे व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, सेवासदन संस्था अध्यक्ष शीला मिस्त्री, सचिव वीणा पतकी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे ,उप मु.ख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ . स्वाती पोतदार यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करण्यात आले .प्रमुख पाहुणे डॉ. शिवरत्न शेटे यांचा सत्कार सेवासदन संस्था अध्यक्ष शीला मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे यांनी सादर केले . डॉ. शिवरत्न शेटे यांनी व्याख्यानात मार्गदर्शन करताना सांगितले की पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, मोबाईलचा अतिरेकी वापर यांच्यामुळे सध्याची तरुणाई अनेक गुन्हयांकडे वळत आहे. त्यासाठी आज छत्रपतीशिवरायांचा आदर्श ,त्यांचा मातृशक्ती विषयी असणारा आदर आज प्रत्येकाने स्मरणात ठेवला पाहिजे, तरच भारत देश महान बनेल .

शिवाजी महाराज यांना माता जिजाऊंनी संस्कारांचे बाळकडू दिले आणि स्वराज्याची महान निर्मिती त्यांच्या हातून घडली .आज पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद साधण्याची गरज आहे. अनेक कर्तबगार स्त्रिया अहिल्याबाई होळकर, कित्तुर राणी चन्नमा , केलदि चन्नमा ,मल्लमा ईश प्रभुदेसाई यांच्या विषयी माहिती असणे गरजेचे आहे . सायबर गुन्हे घडत आहेत तेव्हा विद्यार्थिनींनी आपला मोबाईल नंबर, माहिती अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका त तसेच आत्मसंरक्षणाचे कराटे, ज्यूदो हे प्रकार शिकून अन्यायाशी लढा देण्यास शिका . महाराष्ट्र सारख्या महान राज्यात तुमचा जन्म झाला आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचलच पाहिजे . पुस्तके वाचन वाढवा . पालक शिक्षक यांच्याशी संवाद साधा.

कार्यक्रमप्रसंगी सेवासदन संस्था अध्यक्ष शीला मिस्त्री , सचिव वीणा पतकी , सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई ,पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार ,शिक्षक प्रतिनिधी श्री .सतीश घंटेनवरू, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ,विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ अश्विनी वाघमोडे यांनी केले.