भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिना निमित्त सेवासदन प्रशालेत संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांच्या विकासावर देशाचा विकास होतो असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव वीणाताई पतकी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वाहतूक सुरक्षा दलाचे शिक्षक रेवणसिद्ध कट्टे यांनी यावेळी शाळेतील सर्व विभागाचे संचलन सादर केले. डॉ. राजीव प्रधान, जळगाव येथील जिल्हा न्यायाधीश सानवी श्रीधर गवई यांच्या हस्ते, शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ संविधान शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. संजीवनी नगरकर बालवाडीच्या प्रमुख संगीता आपटे, पर्यवेक्षक स्वाती पोतदार यांच्यासह शाळेतील विद्यार्थिनींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, माध्यमिक विभागचे शिक्षिका अश्विनी मोरे यांनी केले.



