येथील श्री. हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर आयोजित स्व. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील कु. वैष्णवी थोरात हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले तर कु. मानसी गायकवाड हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. मोबाईल व संगणक नसते तर, आणि लोकशाही व निवडणूक या विषयावर ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात थोरात आणि गायकवाड या विद्यार्थिनींनी निबंध सादर केला होता. तसेच वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अहिंसा प्रश्नमंजुषा स्पर्धेत महाविद्यालयातीलच कु. संस्कृती माने, कु. समिक्षा भानवसे, कु.रत्नप्रभा अवताडे आणि कु. सुधाराणी नागलगाव या विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रा. योगिनी गायकवाड आणि प्रा. गीता मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी पुणे सेवासदन संस्था सोलापूर शाखेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, सचिव वीणा पतकी कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत येळगावकर, श्रीमती विद्या लिमये, पद्माकर कुलकर्णी, सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी पारितोषिक प्राप्त सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.
