सेवासदन प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन साजरा


सोलापूर – राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देणे आहे. २२ डिसेंबर हा दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्यांना ओळखण्यासाठी प्रामुख्याने साजरा केला जातो. अशी माहिती दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयचे प्रा. किसन शिंदे यांनी दिली. येथील सेवासदन प्रशाला सोलापूर येथे गणित दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रा. किशन शिंदे बोलत होते. याप्रसंगी गणित दिनाबद्दल शाळेतील विद्यार्थिनी हर्षदा आवारे हिने माहिती सांगितली तर गायत्री पाटील हिने गणितातील क्लृप्त्या, गमती जमती आणि पाढे तयार करणे याविषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासहित दाखवली. आर्या सुरडे हिने गणितीय गोष्ट सांगितली. महाराष्ट्रातील गणितज्ज्ञ दत्तात्रय कापरेकर आणि शरदचंद्र श्रीखंडे यांच्याविषयी अल्फिया मुलाणी हिने माहिती सांगितली. त्यांना गणित विभाग प्रमुख गीतांजली पेशवे आणि रूपाली पवार यांनी मार्गदर्शन केले. गणितीय गाणे नम्रता चव्हाण, तन्वी बाबर, श्रावणी पाटील, भाग्यलक्ष्मी दोडमणी यांनी सादर केले. त्यांना संगीत शिक्षक विलास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. गणित विभाग प्रमुख गीतांजली पेशवे आणि रूपाली पवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम प्रसंगी सेवासदन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी सतीश घंटेनवरू, यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.