रानफूल योजने अंतर्गत इयत्ता ९वी क मधील विद्यार्थिनींनी एन . जी . मील चाळ ,’पाटील चाळ येथील महिलांसाठी उद्बोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले विद्यार्थिनींनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले . त्यानंतर विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला कै. सिंधूताई सपकाळ , आनंदीबाई जोशी दिपीका कुमारी , मिताली राज , सावित्रीबाई फुले यांचे कार्य यांविषयी माहिती सांगितली . कार्यक्रमाचा हेतू हा ‘महिलांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण व्हावी एक आई शिक्षित झाली तर सर्व कुटुंब साक्षर होते ‘ या दृष्टीने शिक्षण विषयक साक्षरता अभियानाची माहिती देण्यात आली. लिंबू चमचा , उखाणे , विनोदी कथा असे मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या .व त्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक काढून त्यांना बक्षिसे देण्यात आली सूत्रसंचलन कु आतिया तांबोळी हिने केले. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रशालेतील शिक्षिका सौ. स्मिता कोर्टीकर व सौ. अर्चना राऊत यांनी केले . कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला




