सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सव उत्साहात संपन्न ३० शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयीन संघांचा उत्साही सहभाग श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाला सोलापूर – येथील सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या दर्शकपूर्ती महोत्सव अंतर्गत आयोजित आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सवात समूहनृत्य स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धे त दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेने सेवासदन कलाकौमुदी युवती चषक पटकावला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय आयोजित या स्पर्धेत ३० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन संघांनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव वीणा पतकी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धे त सहभागी संघांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवली. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या उपाध्यक्षा डॉ. मीरा शेंडगे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करण्यासाठी सेवासदन संस्थेकडून नेहमीच चांगले उपक्रम राबविले जातात. आज अनेक क्षेत्रात सेवासदनच्या विद्यार्थिनींनी आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे असे यावेळी बोलताना डॉ. मीरा शेंडगे यांनी सांगितले. विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात आली. सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुजाता उपासे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. सुप्रिया केसकर आणि प्रा. गीता मोहोळकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सविता मादळे यांनी आभार प्रदर्शन केले.
खालीलप्रमाणे सेवासदन कला कौमुदी युवती महोत्सव चषक विजेता दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर सेवासदन कला कौमुदी याप्रसंगी व्यासपीठावर पुणे युवती महोत्सवाचा निकाल सेवासदन संस्था सोलापूर शाखेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, सचिव सौ. वीणा पतकी, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव प्रधान, पद्माकर कुलकर्णी, प्रा. तृप्ती बापट, अॅड. अर्चना कुलकर्णी, श्रीमती पुष्पा आगरकर, सुलभा पिशवीकर, सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे, कार्याध्यक्ष प्रा. सविता मादळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. सौंदर्या बिराजदार आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी श्रीनिवास काटवे आणि प्रा. वैष्णवी शिरसीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. समूहनृत्य स्पर्धा शालेय गट प्रथम क्रमांक – सु. रा. मुलींची प्रशाला सेवासदन द्वितीय क्रमांक संभाजीराव शिंदे प्रशाला उत्तेजनार्थ – भू. म. पुल्ली प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम क्रमांक विभागून एच.बी सोन कॉलेज व सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय डी. द्वितीय क्रमांक – हिराचंद नेमचंद ज्युनिअर कॉलेज तर उत्तेजनार्थ – गांधीनाथा रंगजी ज्युनिअर कॉलेज.
























